इस्लामी समतेच्या पथावर विवेकानंद

देशातील प्रतिगामी शक्ती विवेकानंदांना मुस्लिमविरोधी आणि इस्लामविरोधी म्हणून सादर करतात. आपल्याला हवी ती आणि हवी तशी विधाने विवेकानंदांच्या साहित्यातून ‘निवडून’ समाजविघातक शक्ती सर्वसामान्यांची डोकी भडकाविण्याची कामे करीत आहेत. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय चरित्रांचे अपहरण करून त्यांच्या तोंडात आपले विचार टाकून समाज भ्रष्ट करीत आहेत. विवेकानंदांचे अपहरण करून त्यांना मुस्लिमविरोधी आणि इस्लामविरोधी बनवून  सादर केले जात आहे. यामुळे सर्वसामान्य हिंदू तरुण नकळत मुस्लिमविरोधी होत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होत आहे.

सत्य तर हे आहे की विवेकानंदांनी आपल्या व्याख्यान आणि लेखनातून इस्लामचा गौरव केला आहे. इतिहासात झालेल्या कथित अत्याचारांसाठी ते इस्लाम धर्माला नव्हे तर व्यक्तींना दोष देतात. भविष्याच्या विचार करताना देशाच्या नवनिर्मितीसाठी केवळ हिंदू-मुस्लिम सहकार्यच नव्हे तर परस्पर समन्वयाची गरज असल्याचे आग्रहाने प्रतिपादित करतात. तसेच केवळ हिंदू-मुस्लिम समाजाचा समन्वय त्यांना अभिप्रेत नसून ते वैदिक तत्वांची इस्लामी समाजव्यवस्थेशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. इस्लामच्या व्यवहारिक आचरणाशिवाय वैदिक तत्व निरुपयोगी असल्याचे ठासून मांडतात. जगाच्या विकासातील, युरोपच्या उन्नतीतील आणि भारताच्या समाजसुधारणेतील इस्लाम आणि मुस्लिमांचे योगदान ते वारंवार अधोरेखित करतात.

विवेकानंद धर्माभिमानी हिंदू जरूर होते, परंतु ते इतर धर्मांचा द्वेष करणारे अधर्मांध[1] नव्हते. त्यांचे इस्लामबद्दलचे विचार काय होते आणि मुस्लिम समाजाकडे पाहताना ते कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचे हे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या छोटेखानी पुस्तकातून केला गेला आहे. नरेंद्र दाभोलकर यांचे ज्येष्ठ बंधू दत्तप्रसाद दाभोलकर यांच्यासारख्या अनेक विद्वानांनी पुस्तकाची स्तुती केली आहे. मुस्लिम समाजातील अनेक जमाती, तंजीम आणि इदाऱ्यांनी पुस्तकाचे मोफत वितरण केले. अनेक मौलाना, विद्वान आणि विचारवंतांनी पुस्तकाला आपल्या पंसतीची पावती दिली. जानेवारी २०१८ ला प्रकाशित पुस्तकाची पहिली आवृत्ती जवळपास संपत आली आणि दुसऱ्या आवृत्तीची मागणी होऊ लागली. पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात समाजजागृती व्हावी या उद्देशाने मार्च २०१८ पासून पुस्तकाच्या PDF प्रती सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोफत वितरीत करण्यात येत आहेत.

जर तुम्हाला सदरील पुस्तक उपयुक्त वाटत असेल तर हे पुस्तक तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा तुमच्या संस्थेच्या नावाने प्रकाशित करू शकता. सामाजिक जनजागृतीसाठी सदरील पुस्तकाच्या आशयात, प्रकरणात, लेखात, परिच्छेदात कोणताही बदल न करता विक्री किंवा मोफत वितरणासाठी प्रकाशनाची खुली परवानगी देण्यात येत आहे. प्रकाशित आवृत्तीच्या काही प्रती संदर्भासाठी लेखकाकडे पाठविण्यात याव्यात. प्रकाशनासाठी Original Document File विनामूल्य दिली जाईल.

समाज जागृतीच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा. पुस्तक Download करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *