शिवचरित्र – एक मुसलमानी आकलन

शिवाजी राजे मुस्लिम द्वेष्टे होते, ते मुस्लिमांचा द्वेष करायचे. शिवाजी राजांशी निष्ठा राखायची असेल तर मुस्लिमांचा द्वेष करायलाच हवा. परिणामी देशाला मुस्लिममुक्त करायलाच हवे; अशा स्वरूपाचा अपप्रचार करून बहुसंख्यांक समाजातील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम काही असामाजिक प्रवृत्ती करीत असतात. इतिहासातील प्रभावशाली चरित्रांना आपल्या राजकारणातील एक प्रभावी अस्त्र म्हणून हे स्वार्थी लोक वापरत असतात. परंतु खरेच शिवाजी राजे यांनी जो संघर्ष केला, तो मुस्लिम विरोधी होता का, हे पाहणे गरजेचे आहे.

शिवरायांच्या कालखंडात मोगल, आदिलशाह, कुतुबशाह यांची सत्ता होती. स्वराज्याच्या स्थापनेसाठी यांच्याशी लढणे अपरिहार्य होते. त्यामुळे शिवाजी राजांनी दिलेला लढा हा धार्मिक नव्हे तर राजकीय लढा होता. शिवरायांचा संघर्ष इस्लामविरोधी किंवा मुस्लिमविरोधी नव्हता. शिवाजी राजांचा लढा मुस्लिमविरोधी असल्याचा एकही पुरावा आपल्याला सापडत नाही.

अनेक विचारवंत, अभ्यासक आणि विद्वानांनी पुस्तकाची स्तुती केली आहे. मुस्लिम समाजातील अनेक जमाती, तंजीम आणि इदाऱ्यांनी पुस्तकाचे मोफत वितरण केले. अनेक मौलाना, विद्वान आणि विचारवंतांनी पुस्तकाला आपल्या पंसतीची पावती दिली. फेब्रुवारी २०१८ ला प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपत आली आहे. दुसऱ्या आवृत्तीची मागणी होऊ लागली. पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणत समाजजागृती व्हावी या उद्देशाने एप्रिल २०१८ पासून पुस्तकाच्या PDF प्रती सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोफत वितरीत करण्यात येत आहेत.

जर तुम्हाला सदरील पुस्तक उपयुक्त वाटत असेल तर हे पुस्तक तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा तुमच्या संस्थेच्या नावाने प्रकाशित करू शकता. सामाजिक जनजागृतीसाठी सदरील पुस्तकाच्या आशयात, प्रकरणात, लेखात, परिच्छेदात कोणताही बदल न करता विक्री किंवा मोफत वितरणासाठी प्रकाशनाची खुली परवानगी देण्यात येत आहे. प्रकाशित आवृत्तीच्या काही प्रती संदर्भासाठी लेखकाकडे पाठविण्यात याव्यात. प्रकाशनासाठी Original Document File विनामूल्य दिली जाईल.

समाज जागृतीच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा. पुस्तक Download करण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “शिवचरित्र – एक मुसलमानी आकलन

 • May 26, 2018 at 10:33 AM
  Permalink

  समाज जागृति चा उत्कृष्ट उपक्रम म

  Reply
 • May 26, 2018 at 10:55 AM
  Permalink

  जनाब मुजाहिद शेख सर
  अस्ससलाम अलैकुम
  आपला भाग 1 वाचला खूप चान्गल्या शब्दात माण्डणी केलि आहे
  मला भाग 2 व त्यापुडील बाकिचे भाग माझ्या वाटस अप वर पाठ्वावे ही नम्र इल्तेजा

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *